स्वप्न नगरी
स्वप्न नगरी

1 min

11.7K
स्वप्न नगरीत चौपट राजा
राणी असते हुशार फार
राजा वेंधळा म्हणून चाले
अंधाधुंद कारभार
बहुगुणी राणी असे सोबती
राजा राही मदमस्त होऊन
नगरात काय झालं पाहून
राणी धावत जाते धावून
स्वप्नाची साथ धरून राणी
बसे सिंहासनावर नित्य
येता जाता रस्त्यावर पाहे
करीत स्मित हास्य तुत्य
स्वप्न नगरीत वाहे नदी दुधाची
बर्फीचे होते सारे राजवाडे
मिष्टान्नाची कमी कधी नसता
तरीही राजाला सारे लुबाडे