भावना कळ्यांचे
भावना कळ्यांचे
1 min
186
पापा मला मोकळे आकाश देणार ना!
माझ्या पुढे नवे जग, आव्हान असेल
साथ तुम्ही देणार ना?
विश्वास तुमचा मला आव्हान पेलण्यास
झुंज देताना सोबतीला राहणार ना,
या तुमच्या अबोध बाहुलीला
कलीला फुलण्यास देणार ना...
जगात येताच तू मला आधार देशील ना
पापा तू मजला फुलासारखे बहर घेऊ देशील ना
आईच्या गर्भात सुखरूप राहून काळजी घेशील ना
या जगात तू माझा खंबीर आधार होशील ना.!
