स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
1 min
175
नारी मी अशी लाजरी जरी
तरी मी आहे खट्याळ भारी.
वार करता कोणी मजवरी,
मी चंडी रुप धारी....१
आकाशी झेप घेऊनी
धावते मी फार सत्वरी
कोणी आडवा आला मज
तर मी दोन हात करी....२
मी स्त्री असते, अष्टभुजा धारी
घरातील काम करते भारी,
मीच अन्नपूर्णा,मी सरस्वती
मुलांना संस्कार देते मी झडकरी...३
शक्ती माझी काली परी
मी तांडव करते भारी
रुप माझे अर्धनटेश्वराचे
नृत्यकला पारांगत मी नारी....४
स्त्री शक्ती ची नका घेऊ परीक्षा
ती राणी लक्ष्मीबाई बनून
लढेल पण हरणार नाही
अशी नारी सुंदरी भारी.
