Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Babu Disouza

Others


3  

Babu Disouza

Others


वादळ प्रभाव

वादळ प्रभाव

1 min 173 1 min 173

काहूर उठले आभाळात

वादळ चाहुलीने गावात

झाले सुन्न शांत नि निवांत

धस्स झाले कसे काळजात

-१-

पक्षी परतले घरट्यात

इंद्रिये लख्ख त्यांची दिशांत

सोसाट्याचा वारा फुफाट्यात

अंधारले सारे वादळात

-२-

उन्मळली झाडे अकस्मात

उडाले पत्रे छप्पर घात

उखडले खांब वीज जात

अवघी वाताहत क्षणात

-३-

जाऊनी धूळ नाका तोंडात

हंबरी गुरे ढोरे गोठ्यात

वाटे असुरक्षित दाव्यांत

माणसांचे जीवन वांध्यात

-४-


Rate this content
Log in