वाढदिवस
वाढदिवस
हा हा म्हणता तो दिवस उगवला
आज माझा पार्थ 5 वर्षांचा झाला
वयासोबत त्याच्यात बदल घडू लागले
हत्ती, घोडा, फिश आवडत होते आता superhero आवडू लागले
मी करणार, मी करणार म्हणून प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करणार
करायला दिल तर ते पूर्ण न करताच बाजूला होणार
त्रास देतो कधी , कधी प्रेमाने जवळ घेतो
मम्मा मला तू खूप आवडते म्हणून गोड गोड किसू करतो
मी कधीही न ऐकलेलं गाणं मधेच तो गुणगुणतो
गाणं पडलं कानावर की डान्स भारी करतो
हल्ली painting करायला खूपच आवडायला लागलं
जरा अभ्यास कर म्हटलं तर नाक मुरडायला लागलं
कधी बसलाच अभ्यास करायला तर मन लावून करेल
थोडा अभ्यास झाला की याची लगेच पाठ दुखायला लागेल
सकाळी उठल्यापासून न थकता खेळतच राहतो
खेळताना मग तो तहान भूक पण विसरतो
कधी कधी हट्टीपणा इतका वाढतो
दम दिल्यावरच मग तो नीट वागतो
ओरडल्यावर त्याला मलाच कसतरी वाटते
हळूच मग लाडाने त्याला मी जवळ घेते
मम्मा पडली असता आजारी झोपून ती राहते
काळजी मात्र त्याच्या चेहऱ्यावर दिसत असते
व्हावास तू दिर्घायुषी हीच माझी इच्छा
सर्वांच्या लाडक्या अश्या माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
