उन्हाळा
उन्हाळा
1 min
278
उनाड वारा तप्त ज्वाला घेऊन आला उन्हाळा
थंड पाणी, मन धावे खाण्या बर्फाचा गोळा।।
करीतो हा जीवाची लाहीलाही
वाटसरूला थांबण्यास वाटेत झाड नाही।।
लागली शाळेला सुट्टी
मुलांची जमली मोबाईल आणि खेळाशी गट्टी।।
चिमणी शोधे पाण्याचा घडा
गच्च भरतो गावी झाडाखालचा ओटा।।
गरगर फिरत येतो वारा
घेऊन जातो पालापाचोळा उंच अंबरा।।
धरणी तापली, सूर्य किरणांचा सहन करी वार
प्रतिक्षा करी कधी बरसेल थंड पावसाची धार।।
अंगातून वाहती घामाच्या धारा
जो तो शोधे थंड निवारा।।
दुपारी प्रत्येक गल्ली झाली विराण
तप्त उन्हात सर्व सजीव होती हैराण।।
