STORYMIRROR

Aarya S

Children Stories Others Children

3  

Aarya S

Children Stories Others Children

उंदरांचे नाटक

उंदरांचे नाटक

1 min
240

इटुकले पिटुकले उंदीर धिटुकले

बसवायला गेले छोटे नाटुकले,

नाटकाचे नाव येईल का मनी

मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी.


नाटकाची तयारी जोरात झाली

उन्दरूकल्या प्रेक्षकांची गर्दी झाली,

नाटकाची आता झाली सुरवात

प्रेक्षकांच्या टाळ्या वाह क्या बात.


टाळ्यांची उठली प्रचंड झोड

माउची आता झाली झोपमोड,

नाटक तर जोरात चालले भाऊ

आवाजाच्या मागे आली माऊ.


बांधली नव्हती घंटा गळ्यात

गुपचूप जाऊन बसली सगळ्यांत,

प्रेक्षकांनी बाजूला पाहीली माऊ

पळतच घराकडे लागले जाऊ.


माऊने कलाकारच गट्टम केले,

नाटकाचे पार तीन तेरा झाले.


Rate this content
Log in