STORYMIRROR

Prashant Kadam

Others

4  

Prashant Kadam

Others

उलट

उलट

1 min
664


उलट


नेहमीच आपला प्रवास आपल्या

लक्षाच्या दिशेने पहात केला

कधीतरी उलट दिशेस पाहून करावा

असे मनी वाटले आणि योग आला

लक्षाच्या दिशेने जाताना

मनात सतत असते ईर्षा,


दूसऱ्यास आपल्या मागे टाकून

स्वत:च पुढे जाण्याची प्रबळ ईच्छा

मग त्या साठीची पूर्ण धावपळ

जीवाची दमछाक आणि पळापळ

दुसऱ्याच्या पुढे जावू न शकल्यास

आपल्या मनाची घालमेल व तगमग


समोरच्या बध्दल आकस अन राग

पण उलट दिशेस पहात

प्रवास करतांना विपरीत घडले

काही जण आपल्या पुढे

जातांना नक्कीच दिसले

परंतु मनास त्रास नाही झाला


आपल्या मागे किती तरी

आहेत हे देखील दिसले

अनेकांच्या पुढे आपण आहोत

हे मात्र मनात पक्के रूजले

त्याचाच मनास आनंद झाला

आपल्या मागे सोडलेल्या


स्मृतींचा ठेवा दृष्टीत साठवत

पुढची वाटचाल सूखकर झाली

समोरच्या आव्हानांचे एवजी

मागे सोडलेल्या क्षणांनी अन दृशांनी

मनातील द्वेश भावना दूर झाली

आपल्या मागे राहीलेल्यां पेक्षा

आपण अग्रेसर असल्याची भावना


मनास खूपच सूख देवून गेली

ह्रदयास आनंद देवून गेली

उद्दिष्ट लक्ष समोर नसले दिसले

तरी प्राप्त आव्हानांचे मोल

व इतरांपेक्षा अग्रेसर असल्याचे मोल

नक्कीच खूप ठरले अनमोल !!


प्रशांत कदम,

९५९४५७२५५५

२४-१२-२०१८.



Rate this content
Log in