उजळे आसमंत
उजळे आसमंत
1 min
283
प्रकटला चंद्रमा नभी,
संगती चांदण्याचा काफिला,
हुंदडावे मनाजोगते,
असावे संगती तू साथीला.
पडले टिपूर चांदणे,
मंद प्रकाश हा देखिला,
अंगणी पसरले तारांगण,
आहे चराचर हे साक्षीला.
चंद्र,चांदण्या उजळित आल्या,
आसमंत हा खुलला सारा,
अंधारलेल्या पर्णकुटीला,
उजेडाचा तितुकाचि सहारा
