Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Babu Disouza

Others


3  

Babu Disouza

Others


उद्रेकानंतर

उद्रेकानंतर

1 min 234 1 min 234

वळले रक्त विद्रोहाचे झाले निष्प्रभ वाळूनी

थिजल्या उर्मि उसळत्या जाता प्रवाह टाळूनी

मातला चंद्र पौर्णिमी मिरवी लांछन माळूनी

शीतल आल्हाद दर्शनी गेल्या तारका भाळूनी

-1-

येऊ पाहे वसंत ऋतु पानगळीचे गाळूनी

शोधीती वृथा समाधान जीवा आपल्या जाळूनी

गेले निर्लज्जांनी संस्कार आदर्शाचे ओशाळूनी

चळली मति विवेकी गेले ते आयुष्या चाळूनी

-2-

तुटले बंध कायमचे प्रीती वचना पाळूनी

होती दुःखात सहभागी दोन आसवे ढाळूनी

ऊन सांवलीच्या खेळाने गेले जीव भंजाळूनी

पाश नात्यांचे चिवट येतसे भाव उफाळूनी

-3-


Rate this content
Log in