STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

उद्रेक

उद्रेक

1 min
414

अनंतशा कालौघात

ती सहनशील आहे

ज्वालामुखीचा उद्रेक

का खदखदतो आहे?


भ्रुणहत्या छुपेपणे

का आजही होते आहे?

तिचे आस्तित्व का बरे

नकोसे वाटते आहे ?


बुद्धिमत्ता सारखीच 

नाही कुठेच ती कमी

भाऊ तिला डावलून

का बरे शिक्षण घेई?


पदभार मिळूनही 

मुस्कटदाबी होतेच 

सही केलीच पाहिजे 

असा दबाव आहेच 


लग्नातही खर्च नाही 

समसमान वाटून

वधूपिता भार वाही

जनरीतच म्हणून


कधी सारे हे थांबेल?

कोण चक्र उलटेल?

कधीतरी उसळेल!!

अन्यायाला उलथेल!!


घेईल दुर्गावतार

करी दानवसंहार

होईल आत्मनिर्भर

चालेल स्वबळावर


रामराज्य जेव्हा असे

धरणीवर नांदेल

धगधगता उद्रेक

तेव्हाच पूर्ण शमेल


Rate this content
Log in