उधळण
उधळण
1 min
232
छंद असो एक तरी
मनामध्ये जपलेला
मोद ओसंडो साराच
आतमध्ये लपलेला
माराव्यात मस्त गप्पा
अनोळखी माणसांशी
दोस्ती करावी सारीच
मुक्त अशा निसर्गाशी
उधळण निसर्गाची
डोळे भरून पाहवी
रोम रोमात भरून
जरा मनात उरावी
छंद माझा हा वेगळा
कुणा कसा उमजेल
दूर राहून तुम्हा तो
सांगा कसा समजेल
