STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

तू ....

तू ....

1 min
336

पहाटे पडलेलं स्वप्न तू 

स्वप्नातील भास तू 

माझ्यासाठी खास तू 

जगण्याची आस तू ....


लडिवाळ अट्टहास तू 

प्रेमाचा घास तू 

माझ्यासाठी झक्कास तू 

सोबतीचा विश्वास तू ....


सुगंधी दरवळ तू 

जीवनाची हिरवळ तू 

माझ्यासाठी निव्वळ तू 

सविनय चळवळ तू ..


गर्भार भूमीची प्रतिकृती  

वंशवृद्धीची आस तू

माझ्यासाठी अनामिक तू ?

हरितक्रांतीची निर्मिक तू 


अतोनात छळ तू 

जगण्याचं बळ तू 

जगण्याची आबाळ तू 

तरीही अन्नपूर्णा सांभाळ तू 


Rate this content
Log in