तू श्रावणातील ऊन पाऊस.. !!
तू श्रावणातील ऊन पाऊस.. !!


तू श्रावणातील ऊन पावसा सारखा,
क्षणात हसवनारा ,क्षणात रडवनारा.
कधी स्वतःच सव्हता मध्ये रमनारा,
कधी न बोलता सगळ जाणणारा,
कधी नजरेतुन बरेच बोलनारा.
तू कधी इंद्रधनुची बरसात,
कधी अस शी तू मेघ मल्हार.
कधी हवी हवीशी प्रेमाची झूळक हळूवार.
कधी माझ मन जपनारा,
कधी मना मध्ये खोलवर रुतनारा.
कधी काहीच न सांगता दूरदूर जाणारा,
कधी जवळ असून ही अंतर राखनारा.
तू श्रावणातील ऊन पावसा सारखा,
क्षणात सोबत असणारा,
क्षणात सोबत सोडनारा...