STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

तू नव्या युगाची आशा

तू नव्या युगाची आशा

1 min
249

तमोमय अंधःकार

तिच्या सभोवती होता

रांधा वाढा उष्टी काढा

हाच वसा तिज होता   (1)


शिक्षणाने बदलले

तिच्या भवतीचे विश्व

ज्योतिबा नि सावित्रींनी

केले तिजला आश्वस्त   (2)


बुद्धिचातुर्याने तिने 

समतेस सिद्ध केले

सर्व क्षेत्रे जिंकूनिया

वर्चस्वही सिद्धकेले    (3)


नवनवी कार्यक्षेत्रे

झाली कर्तृत्वास खुली

भूदलाचे रणांगण

अवकाश पाणबुडी     (4)


नव्या युगी नववाटा

तिज आव्हाने दाविती

क्षितीजही तिचे आता

विस्तारुनी उभारती    (5)


Rate this content
Log in