STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Others

4  

Sarita Sawant Bhosale

Others

तू न मी एक व्हावे

तू न मी एक व्हावे

1 min
145

जगणे थोडे कठीण होते सोपे झाले तू आल्यामुळे

फुल नुसतीच फुलायची सुगंध आला तू आल्यामुळे

पाऊस फक्त बरसायचा मोर नाचायला लागले तू आल्यामुळे

रस्ता तर चालायचे मार्ग भेटला तू आल्यामुळे

अंधारातही प्रकाशवाटा दिसल्या तू आल्यामुळे

आयुष्य गुलमोहर झालं तू आल्यामुळे

जगण्यास या अर्थ लाभला तू आल्यामुळे

भय आता वाटते तुजवीण जगण्याचे

स्वप्नही आता नको वाटते एकटेपणाचे

माझ्यातुनी तू कधी न वेगळे व्हावे

तू न मी एक जीव व्हावे

कोणीतरी तू प्रत्येकाच्या आयुष्यात असतो/असते त्या "तू" साठी समर्पित


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍