तुळस...!
तुळस...!
1 min
14.6K
तुळस दारीची माझ्या
आधार मला वाटते
पाहताच तिला सकाळी
दुःख पळून जाते
दवबिंदूंची साठवणी
पानापानावर चमकते
जी सुखांच्या क्षणांची
साक्ष मज देते
जमेस माझ्या सुखाची
यादीच आनंत झाली
दुःख खर्चीता हसत मुखाने
सुखाची साठवण खूप झाली
शिदोरी अनंत सुखांची
तुळस दारी घेऊन उभी
विरून गेले दुःख सारे
पाहतो त्यास मी नभी
हात जोडूनी सकाळी
तुळशीस वंदीतो मनोभावे
सांगते तुळस कराग्रे वसते लक्ष्मी
म्हणुनी कार्यास रे बाळा लागावे
आधारास अशीर्वाद तिचा
शिरावरी सदैव घेऊनी
कार्यास लागतो मी सकाळी
मन चित्त प्रसन्न करुनी....!