तुला पाहते रे!
तुला पाहते रे!
1 min
288
नयनांच्या आरशात, तुला पाहते रे,
मनाच्या आकाशात, तुला पाहते रे!
पहाटेच्या दवात, तुला पाहते रे,
स्वप्नांच्या गावात, तुला पाहते रे!
सागराच्या लहरीवर, तुला पाहते रे,
पावसाच्या सरीवर, तुला पाहते रे,
लहरणा-या पदरावर, तुला पाहते रे,
बहरणा-या फुलावर तुला पाहते रे!
आसवांच्या ओलाव्यात, तुला पाहते रे,
अंगणातील ताटव्यात, तुला पाहते रे!
