STORYMIRROR

Raakesh More

Others

3  

Raakesh More

Others

तुला माझं प्रेम दिसेल का ?

तुला माझं प्रेम दिसेल का ?

1 min
224

काळीज चिरून दाखवेन तुला

इतकं प्रेम तुझ्यासाठी

कोणाच्या हृदयात असेल का 

प्रश्न इतकाच आहे माझ्यापुढे सखे 

तूझ्या इगोच्या चष्म्यातून

तुला माझं प्रेम दिसेल का ||0||


तूला प्रेम कळत नाही म्हणून

मलाही ती संवेदना कळू नए 

हा बालिश अट्टाहास माझ्यात नाही 

हृदयात व्यथा जळत नाही म्हणून 

माझं हृदय तुझ्यासाठी हळहळू नए 

हा कट्टर उपहास माझ्यात नाही 

मी पर्वा केलीच नाही कधी 

तूझ्या कठोर हृदयात कधीतरी 

माझी प्रीत वसेल का 

प्रश्न इतकाच आहे माझ्यापुढे सखे 

तूझ्या इगोच्या चष्म्यातून

तुला माझं प्रेम दिसेल का ||1||


लाथाडून जाताना हृदय माझं 

तुला काहीच कसं वाटंत नाही 

हे नवल तर वाटतं 

आकाश भरून यावं पावसात 

असं भयाण अंधारात माझं हृदय

क्रूर दुःखाने दाटतं  

हृदयात माझ्या वेदना कोरलेय तुझी 

तुझ्या हृदयात माझ्या अंतरीची

प्रेमभावना ठसेल का 

प्रश्न इतकाच आहे माझ्यापुढे सखे 

तूझ्या इगोच्या चष्म्यातून

तुला माझं प्रेम दिसेल का ||2||


म्हणतात प्रेम निर्माण होत नाही 

ते हृदयात असावं लागतं 

आजवर ऐकत आलोय 

असं असलं तरी ते हृदयात तुझ्या 

निर्माण होईल कधीतरी 

या आशेने वेडा झालोय 

प्रेमाच्या ओलाव्याने बघून माझ्याकडे 

कधीतरी अनपेक्षितपणे तुझी 

नजर सखे हसेल का 

प्रश्न इतकाच आहे माझ्यापुढे सखे 

तूझ्या इगोच्या चष्म्यातून

तुला माझं प्रेम दिसेल का ||3||


वेडावून जातात दिशा दाही

कधीकधी एकांतात वाटतं

मी थट्टेचा विषय तर नाही ना

ज्याच्या अर्थबोध झाला नाही आजवर

अशा विषयाचा माझ्या प्रेमाचा

आशय तर नाही ना

मनाला स्पर्शन जातात विचार अगणित

खरंच इतकं प्रेम करूनही ती

माझ्या नशिबात नसेल का

प्रश्न इतकाच आहे माझ्यापुढे सखे

तुझ्या इगोच्या चष्म्यातून

तुला माझं प्रेम दिसेल का ||4||


Rate this content
Log in