तुका म्हणे
तुका म्हणे


थोर संत सुस्वभावी /
नांदतसे देहूगावी /
तुकारामांची थोरवी /
वर्णाया अगाधचि // (1)
शांत , गोड असे वाणी /
हरिनाम सदा मनी /
सदा चित्ती समाधानी /
नामस्मरण सदा // (2)
प्रपंचात राहूनिया /
परमार्थ साधूनिया /
अभंगाते रचूनिया /
गायनही सुस्वरे // (3)
संत तुकयांची वाणी /
आली गाथा स्वरुपानी /
तरे इंद्रायणीतूनी /
संतांचिया पायी रे // (4)
नसे लोभ संपदेचा /
नसे रुक्ष , कटू वाचा /
जप विठ्ठल नामाचा /
सदा असे मुखात // (5)
प्रेम वृक्ष , वल्लरींसी /
मूक पक्षी नि प्राण्यांसी /
प्रसन्न देव मानसी /
सदाचार पाहूनी // (6)
देवांनीच बोलाविले /
सदेह वैकुंठी गेले /
प्रत्यक्षचि पाहियले /
इहलोकावरी रे // (7)