STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Others

3  

Sarita Sawant Bhosale

Others

तुझ्याविना अपूर्ण मी

तुझ्याविना अपूर्ण मी

1 min
401

शब्द तू चाल मी, सूर तू ताल मी तू

छेडिल्या तारांतील गीत मी निःशब्द तू भावना मी

हास्य तू किनार मी तुझ्या डोळ्यातील अव्यक्त प्रेम मी

श्वास तू गंध मी,ध्यास तू मन मी तुझ्या ह्रदयातील स्पंदने मी

चंद्र तू रात्र मी,स्वप्न तू नयन मी

तुझ्यात हरवलेली रातराणी मी ओंजळ तू आसू मी,

छाया तू तप्त ऊन्ह मी

तुझ्यात न्हालेली चिंबसरी मी कौतुक तू सौंदर्य मी,

आरसा तू अस्तिव मी

तुझ्यात वसलेली प्रीत मी तू साथ सोबत मी,

तुझ्यासवे पूर्ण मी तुझ्याविना अपूर्णच मी....


Rate this content
Log in