तुझ्या एका थेंबासाठी...
तुझ्या एका थेंबासाठी...
1 min
65
तुझ्या एका थेंबासाठी
गळा चातकाचा सुकतो.
तुझ्या वाटेकडे बळीराजा
डोळे लावूनिया बसतो.
राजा मनाचाच तू तुझ्या
झाली मर्जी तर आबादानी
नाही पिकलं हे रान तर
सारेच करती रे वेड्यावानी.
तुझ्या पहिल्या भेटीची
लागे जीवाजीवास ओढ
तुझ्या सरीत भिजताना
थेंब थेंब लागतो गोड.
मातीचा सुवास भरतो मनी
ओली माती गाते गोड गाणी
पावसा तुझी दुनिया दिवानी
तू असता दुःखी नसे कुणी.