STORYMIRROR

Supriya Devkar

Others

4  

Supriya Devkar

Others

तुझाच नवा छंद

तुझाच नवा छंद

1 min
349

दररोज मला जडला आहे 

तुझाच नवा छंद आहे 

सजलेल्या मंडंपाला

 तुझ्या हास्याची झालर आहे 

दररोज मला पडला आहे

अनोखा असा प्रश्न आहे

विझलेल्या वातीला 

रोज नव्याने जळणे आहे 

 दररोज मला धावणे आहे 

हरवलेले गवसणे आहे 

तुझाच प्रश्नांच्या उत्तरांना 

नव्याने पुन्हा शोधणे आहे



Rate this content
Log in