तुझा अबोल इशारा
तुझा अबोल इशारा
1 min
334
गंधाळल्या सांजवेळी
तुझा अबोल इशारा
वेडावला जीव माझा
धुंद आसमंत सारा
पापणीत स्वप्न साठे
मज तुझाच सहारा
भावनांचा आवेगच
देईल कडा पहारा
जागेपणीच मिटले
डोळे शोधित किनारा
सुखस्वप्नांना मिळेल
कधी तुझाच निवारा
विरहातही गुंतला
जीव तुझ्यातच सारा
कसा आवरू सखया
हा मनातला पसारा
विरलेल्या जीवास या
साद घाली मज वारा
आठवांच्या धुक्यातही
गवसे आनंद सारा