टपोरे थेंब झेलताना
टपोरे थेंब झेलताना

1 min

71
टपोरे थेंब झेलताना
उरत नाही कसले भान
ओंजळ वाहते ओसंडून
निथळत राहते मनाचे पान.
टपोरे थेंब झेलताना
भास हाताला मोतीया
उडती तुषार मुखावर
मोहरते अवघी मग काया.
टपोरे थेंब झेलताना
मन पोरातलं हो पोर
भोवती लपेटून वारं
मन नाचरा होते मोर.
टपोरे थेंब झेलताना
सय तुझीच रे छळते
तुझ्या विरहात सखया
भिजलेली काया जळते.