Akash Wankhede

Others

3  

Akash Wankhede

Others

टिम्ब

टिम्ब

1 min
251


शतकोत्तर पाहिला असा वर्षारंभ ! 

आयुष्यावर लावले पूर्णविरामाचे टिम्ब ! 

सगळीकडे उठली नुस्ती बोंबाबोंब! १! 


जग झाले मानसिक रुग्ण ! 

सारे जण स्वतःमध्ये मग्न! 

निस्तेज चेहरे कसे भग्न ! 

हा मुहूर्ताचा समय अशुभ! 

शतकोत्तर पाहिला असा वर्षारंभ ! २! 


बंद शब्द पडता कानी ! 

मनात येते चीड भरून ! 

 सोसायचे तोवर सोसले सारे! 

अजून किती राखावी सब्र! 

शतकोत्तर पाहिला असा वर्षारंभ ! ३! 


खरंच धडकी भरते उरात 

 बघता सुनसान सारे रस्ते! 

चौक नेहमीचा वेगळाच दिसते ! 

बिना आगीचा उठलाय डोंब ! 

शतकोत्तर पाहिला असा वर्षारंभ ! ४! 


नातं नातं नाही राहिलं ! 

अशी कशी स्थिती उदभवली ! 

अपेक्षा आणि विश्वास गेला ! 

तरी गुपचूप पाहतो हेरंब ! 

शतकोत्तर पाहिला असा वर्षारंभ ! ५! 


हातगाडी ते हवाई जहाज ! 

सगळ्यावर पडली आज गाज ! 

कोलमडली बघा नियमित घडी ! 

होईल कधी नव्याने प्रारंभ ! 

शतकोत्तर पाहिला असा वर्षारंभ ! ६! 


Rate this content
Log in