STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

ठग

ठग

1 min
252

रस्ते झाले मोठे, अन् प्रवास झाला छोटा.

पण आपल्यांसाठी वेळच नाही, माणूस झाला मोठा.


अहंकारी दागिने मिरवी, मी पणाचा तो रुबाब.

भगवंताच्या पुढ्यात द्यायचाय, काय आहे तो हिसाब.


काय होती दुनिया, चेष्टा मस्करी आणि हसवाफसवी.

ठगांनी त्याला विकसित केलं, राहिली आता फसवाफसवी.


पहावं ते विचित्र आणि, ऐकावं ते नवलच.

परिस्थिती स्वतःवर आली की, मग लगोलग कळेलच.


मोडून मुंड्या गरिबांच्या, ऐशोआराम तुम्ही कमावला.

एवढं सार करून, आपल्यांच्या नजरेत मान मात्र गमवला.


नाही लागत डोळा रात्री, की दिवसा नजरानजर नाही.

एवढं कमवूनसुद्धा विचार करतो, बाकी राहिलं का काही.


मोडून सारा माज, एकदा स्वाभिमानाने जगून तरी बघ.

सगळेच सुधारल्यावर, या समाजात उरणार नाहीत ठग.


Rate this content
Log in