ठेवा शांत आसमंत
ठेवा शांत आसमंत


झाडा रे झाडा रे सारे कानेकोपरे झाडा रे
करा रे करा रे साफ करा रे देऊळ सारे
मनाचे कानेकोपरे ! या मनाचे कानेकोपरे !
देव चालले शयनी ! ठेवा शांती या सदनी !
नको कलह विद्रोह ठेवा आचरण शुद्ध
घेऊद्या हो देवा आराम वागू नका अनिर्बंध
पाळा शांती चातुर्मास! जपताप ऊपवास !
देव चालले शयनी ! ठेवा शांती या सदनी !
काळ हा काळजीचा वीणीचा पेरणीचा
देऊ जीवांना विश्रांती राखू शेतमळा निगुती
घ्या काळजी पोटाची कशापायी हो खराबी
देव चालले शयनी ! ठेवा शांती या सदनी !
ऱ्हावा स्वतः खुशाल नको उगी चालढकल
ठेवा स्वच्छता शांती जपा सारे आसमंती
जसे पेराल उगवाल नको मस्ती उलाढाल
देव चालले शयनी ! ठेवा शांती या सदनी !