तथास्तु
तथास्तु
धकाधकीच्या युगात
होऊन बसलो देव !
ईच्छा आकांक्षा येथे
पुरुन ध्यानास्त मी भव !
येणे जाणे कुणाचे
नाही हाती कधी आपल्या रे !
उगा मन हे गुंतता
आठवणीच भल्या रे !
परिस्थितीशी झुंज
लढता लढता जाई जिव..
बदल्याच्या जिद्दीला
नाही आली कधी किव..!!
देऊन वरदान परिस्थितीला
जगून मी बघितलं..
स्वतः मरुन येथे
तिला हसताना मी बघितलं..!!
नातेसंबंध माझे सारे
ओझं त्यांना मी झाले..
राहून मी दूर आता
वर त्यांना ही दिले..!!
आज आपल्या परीने
जो-तो काही मागत गेले ..
देऊन आनंद त्याला
दु:ख मी विकत घेतले..!!
एकांताचा हा श्राप
स्विकारुन मी बघितले...
मैफलीची होऊन ते रंगत
आज वरदान ते देऊन बघितले..!!
आता मी येथे रे
देव होऊन बघितले..!
तथास्तु म्हणून
सर्व काही देऊन बघितले!!
सर्व काही देऊन बघितले!!
