टेन्शन
टेन्शन

1 min

11.7K
मी न घेतो टेन्शन!
मी न देतो टेन्शन!
पण लोक घेती
माझ्या मुळे .....
उगिच टेन्शन !
लेक लेकी सुना बाळे
जगती ना सुखात
काय म्हणेल जग त्यांना
याचेच घेती टेन्शन !
जगती न स्वतः सुखाने
जगू ना देती आम्हाला
काही करु गेले तरी
सारेच परेशान !
जगा तुम्ही जगू आम्ही
आप आपल्या जगात
घेता कशाला उगीच
समाजाचे टेन्शन ?
शेवटी आहेच येणे
तुमच्या घरात !
झेपेल तेवढे आम्हा
जगू आम्ही सुखात !
घेऊ नका टेन्शन
देऊ नका टेन्शन
ठेवा दुरुन थोडे
आम्हाकडे अटेन्शन !