STORYMIRROR

Vijay Sanap

Others

1  

Vijay Sanap

Others

टेन्शन

टेन्शन

1 min
2.9K


साठी पार केल्या वर सुद्वा

का मरमर काम करायचं

रहा सुखी खाऊन पिऊन

टेन्शन कशाला घ्यायच ।।

हे दुःखतं कधी ते दुःखतं

सारखं नाही कण्हयचं

घ्या गोळी औषध वेळाच

टेन्शन कशाला घ्यायचं ।।

पडल्या असेल सुरकुत्या

तरी खचून नाही जायाचं

सांज सकाळी फिरतांना

टेन्शन कशाला घ्यायचं ।।

जरी असेल बी पी शुगर

का बरं जीवाला खायाचं

जे होईल ते होणारच मग

टेन्शन कशाला घ्यायचं ।।

म्हणत असेल कुणी परकं

ते आपलंआहे म्हणायच

मिळतेना तुमच्या पोटाला

टेन्शन कशाला घ्यायचं ।।

पत्नी म्हणते `म्हतरं`तर

न ऐकल्यावाणी करायचं

ती जर देते तंबाखू चोळून

टेन्शन कशाला घ्यायचं ।।

नसेल दिसत जरी काही

चाचपडून नाही पाहयाचं

असेल मिळत सर्व काही

टेन्शन कशाला घ्यायचं ।।


Rate this content
Log in