STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

तस्मै श्री गुरवे नमः

तस्मै श्री गुरवे नमः

1 min
189

शिष्य मनी वदे / गुरुपौर्णिमेला

दिन उगवला / सुना सुना


कधी न चुकले / वंदन तुम्हांसी

गुरुपौर्णिमेसी / आजवर


घातले थैमान / दुष्ट कोरोनाने

लक्ष्मण रेषेने / अडविले


गुरुमूर्ती दिसे / दिव्य वलयात

नमन क्षणात / भावपूर्ण


आशिर्वच देण्या / आलो तव गृही

खंत नको काही / मनी धरु


विद्या कला क्रीडा / अंग साहित्याचे

मार्ग जीवनाचे / दावी गुरु


असे माझा वास / शिष्यांच्या जवळी

मार्ग वेळोवेळी / दावतसे


सा-या चराचरी / दृष्टी असे माझी 

दक्ष सततचि / कल्याणासी


स्वरांस्वरांमधे / तल्लीन गे व्हावे

यत्न मनोभावे / नित्य करी


नित्याचा सराव / सरस्वती पूजा

हीच गुरुपूजा / जाण मनी


दिला आशिर्वाद / झाले अंतर्धान

मनी समाधान / शिष्याचिया


Rate this content
Log in