STORYMIRROR

Supriya Devkar

Others

4  

Supriya Devkar

Others

तरूण पिढी

तरूण पिढी

1 min
353

भराभर मोठं लवकर व्हायचं

भिरभिरत्या नजरेने जग पहायचं 

वेगवेगळ्या तर्हेने केसं कापायची

नाही जमल तर हिप्पी राखायची

फसफसनारा डिओ मारायचा

जॅकेट घालून काॅलर उडवायचा 

कधी पिझ्झा बर्गर खायचा 

मित्रांसोबत बंक मारायचा 

तरूणाईने जल्लोष करायचा

विसरलोय मोठ्यांचा आब राखायचा

खरेच वागावे का सार्यानी असे 

भविष्य पूढे का तुमच्या दिसे

सोज्वळपणा म्हणजे गावढंळपणा 

हि का आहे नवी संकल्पना 

आजकालची तरूण पिढी 

विसरून चालली सार्या रूढी 

जुन्या गोष्टी विसरू नका 

नव्या गोष्टीवर प्रकाश टाका

नाहीतर येइल प्रसंग बाका

स्वतःच्या हिमतीवर जगायला शिका


Rate this content
Log in