STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

तृतीयपंथी - नपुसंक

तृतीयपंथी - नपुसंक

1 min
546



अर्धनारीनटेश्वर,तृतीयपंथी,किन्नर

किती नावे दिलेत समाजाने मला

भिषण सत्याची जाणिव झाली अन्

साऱ्यांची माया,ममता गेली लयाला....

आम्ही तृतीयपंथी मानवच ना?

मनोरंजनाची कला आमच्या ठाई

व्यथा आमच्या आहे अतोनात

निराधार असूनही काही करता येई.....

ना नर ही आम्ही ना नारीही

अशी आमची संभ्रमावस्था जरी

माणसांच्या गर्दीत आम्हाला मिळे

जनावरापेक्षाही वर्तनूक न्यारी...

नाही कोणी समजत आंम्हा

पण जीवन जगतो या जगात

नाही काही करता आले जरी

आत्महत्या मुळीच नाही करत....

आम्ही तृतीयपंथी मानवच ना?

मनोरंजनाची कला आमच्या ठाई

व्यथा आमच्या आहे अतोनात

निराधार असूनही काही करता येई....

नाही आंम्हा संसारात जागा

आणि स्वप्ने बघण्याचा अधीकार

सजूनी नटूनी फिरतो आंम्ही

चार पैश्यासाठी दारोदार.....

जरी नियतीने खेळ खेळला

निरपराध तृतीयपंथी बनविला

जाणा अमुचे निरागस अंतरंग

फेकू नका जन्मताच कचराकुंडीला....

अनामीक भयाने ग्रासलो होतो मनात

क्षणात नर्क झेलला मी या जीवना

तुमच्यासारखीच मलाही आहे संवेदना

श्वासात भरूनी वाहतात या यातना....


Rate this content
Log in