STORYMIRROR

Vanita Shinde

Others

0.8  

Vanita Shinde

Others

तृतीयपंथी- आम्हालाही जगू द्या

तृतीयपंथी- आम्हालाही जगू द्या

1 min
1.1K


नाही नर अथवा नारी,पण

माणुस तर आहोत आम्ही,

माणुसकीला लावून कलंक

वागू नका जन हो तुम्ही.


स्वातंत्र्याने जगण्याचा आहे

आम्हासही पुर्ण अधिकार,

तरी तृतीयपंथी असे हिणवून

कुटुंबातून का करता हद्दपार?


सांगा काय आहे आमचा गुन्हा?

ना हौस आम्हा असे वागण्याची!

निसर्गाचीच ही देण समजून

वेळ आलीय जीवन जगण्याची.


नटून सजून करतो श्रृंगार

पाहता आम्हा,उडवतात टर,

वाजवून टाळी पसरतो हात

मागतो भिक रोज रस्त्यावर.


थोडासा द्या हो प्रेमळ आधार

आपुलकीने करा आम्हा जवळ,

दुर्भाग्याने खचलेल्या जीवना

उभारण्यास येईल मग बळ.


आम्हासही आहे निरागस मन

थोडे तरी तुम्ही जाणून घ्या,

नका करु जीवघेणा तिरस्कार

माणसासवे आम्हालाही जगू द्या.


Rate this content
Log in