तरीही ती परकी....
तरीही ती परकी....
1 min
1.0K
एका घरची ती धनाची पेटी दुसऱ्या घरची लक्ष्मी
दोन घराचं दान तिच्या पदरात तरीही ती परकी
माहेर क्षणात झालं परक तरी सासर नाही हक्काचं
एक म्हणतो दिल्या घरी सुखी राहा
दुसरा वेळ आली की म्हणतो तुझ्या तू घरी जा
दोन घराचं दान तिच्या पदरात तरीही ती परकी
एक घरात झाली ती हास्याचा झरा
दुसऱ्या घरी झाली हास्याच कारण
सजवली दोन्ही घरे तिने तरी ती परकी
एक घरी दुःखात आधार ती दुसऱ्या घरी दुःखाला फुंकर ती
जीव आणला चार भिंतीत तिने तरी ती परकी
एक घरी नाती जगली दुसऱ्या घरी नाती जपली
भविष्यास घातले जन्माला तरीही ती परकीच
दोन घराचे दान तिच्या पदरात तरीही ती परकी
