तोपर्यंत प्रेमात पडू नकोस
तोपर्यंत प्रेमात पडू नकोस
1 min
437
तोपर्यंत प्रेमात पडू नकोस जोपर्यंत
रहात नाहीस पायावर उभा
दुसर्याच्या जीवावर बिनबोभाट
नाही उभारायच्या सभा
नुसतंच म्हणायचं असतं हो
प्रेम काय सांगून होत का हो
दोन्ही हातांनी टाळी वाजली की
समजायच डाळ शिजली
नजरेला नजर भिडली कि
समजायच प्रिती जडली
प्रेमाला नसतय बंधन
प्रेमाला नसते भाषा
प्रेमी जिवांना असते
फक्त एकमेकांची आशा
