STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

3  

Sunita Anabhule

Others

तो पोलीस असतो...

तो पोलीस असतो...

1 min
232

घरादारासाठी झटतो,

प्रामाणिक राहतो,

जनतेच्या सुखासाठी

अन्यायाशी लढतो, कारण तो पोलीस असतो।।


समाजभान जपतो,

कर्तव्य निभावतो,

दिनरात ड्युटी करतो,

प्रसंगी धोका साहतो, कारण तो पोलीस असतो।।


गुन्ह्यास शासन देतो,

चौर्यकर्म्यास शोधतो,

प्राणाची बाजी लावून

आतंकवाद रोखतो, कारण तो पोलीस असतो।।


देशाचा सैनिक होतो,

आईपरी वात्सल्य देतो,

समाजसेवक बनुनी, 

कर्तव्यतत्पर होतो, कारण तो पोलीस असतो।।


सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय तो,

चोवीसतास ऑनड्युटी असतो,

ऊनवाऱ्याची तमा न बाळगतो,

कायद्याचा आब ठेवतो, कारण तो पोलीस असतो।।


उरी भावनांना कोंडतो,

मन मारुन जिणे जगतो

कर्तव्याला श्रेष्ठ मानतो,

दुर्जनांना ठेचून काढतो, कारण तो पोलीस असतो।।


Rate this content
Log in