तो पाऊस...
तो पाऊस...
1 min
114
मेघ पावसाळी आले
सुटलाय गार वारा
गाणे गाऊ पाहतोय
नील आसमंत सारा
गडगडणारे ढग
माणसांची लगबग
इवल्याशा छत्रीखाली
लपायची तगमग
खळखळणारा झरा
छमछम नाचे थेंब
मोर फुलवी पिसारा
तृणाला फुटले कोंब
डराव बेडूक करी
आले हो ते रस्त्यावरी
इंद्रधनू सप्तरंगी
वृक्ष डोली वार्यावरी
मेघ पावसाळी आले
आरोग्य तेही सांभाळा
चौरसाहार हो घ्यावा
नित्य व्यायाम करावा
आला तो पाऊस आला
वसुंधरा ती नटली
सृष्टी हो सजू लागली
प्राणीमात्र आनंदली
