तो पाऊस
तो पाऊस

1 min

2.7K
गार गार वाहे वारा
काळे ढग दाटले नभा
विजांनी कडकडाट केला
मोर फुलवी पिसारा
पावसाच्या बरसे धारा
सुगंध चोहीकडे दरवळला
निसर्गाने हिरवा शालु नेसला
धुंद-बेधुंद करे मना-मनाला
सारा विश्व हा सजला
स्पर्शुनी तो हृदयाला गेला