STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

तो एक दरवेशी

तो एक दरवेशी

1 min
201

तो एक दरवेशी खराखुरा

रोज नवा खेळ दावतो

असतो मात्र जुनाच

नवा गाव , नवा डाव


तो एक दरवेशी हरहुन्नरी

रोजचा नवा खेळ टोपीबाज

हसतो , रडतो , पाय पडतो

वेष परिधान करून रंगीबेरंगी


तो एक दरवेशी जादूगार

मायावी जग उभं करतो

खोटे खोटे स्वप्न दावतो

काही खिशात , काही उधळतो


तो एक दरवेशी पारंगत

भोळ्या भाबड्याना लुबाडतो

भीती दाखवतो , धमकावतो

पुन्हा शोधतो नवा खेळ , नवा डाव


Rate this content
Log in