तंत्रज्ञानाचे महत्व
तंत्रज्ञानाचे महत्व
1 min
739
तंत्रज्ञानातील प्रगतीने
प्रगतीचे मान वाढले
वेळ कष्ट यांच्या बचतीने
दैनंदिन जीवन सुखावले
स्वयंपाक घरातील वेळ
खूपच वाचू लागला
गृहिणींना त्यामुळे
आराम मिळू लागला
संगणकातील तंत्रज्ञान
झपाट्याने सुधारले
गुगलच्या एका क्लिकवर
ज्ञान उपलब्ध झाले
घरातील सर्वजण
सारखे संगणकात बुडले
एकमेकांसाठी वेळ देणे
विसरुनच गेले !
