STORYMIRROR

Kalpana Deshmukh

Others

3  

Kalpana Deshmukh

Others

तिरंगा

तिरंगा

1 min
240

प्रजासत्ताक दिनी तिरंगा

झळकतो बघ अंबरी,

जातीपातीचा रंग नसावा

लक्ष तयाचे धरतीवरी!!


गडद केशरी रंग असे

प्रतीक धैर्य अन् त्यागाचे

शहिदांनी रक्त सांडले

महत्व जाण बलिदानाचे।।


शुभ्र पांढरा रंग असे

प्रतीक सत्य प्रकाशाचे

वैचारिक दिशा उजळू दे

संदेश द्यावे शांतीचे।।


गडद हिरवा रंग असे

प्रतीक हिरव्या सृष्टीचे

निष्ठा राखू मायभूमीची

जतन करू निसर्गाचे।।


अशोक चक्रातील निळा रंग

प्रतीक हे कालचक्राचे

सागरातील अथांगता

अन् जीवन हे गतिमानाचे।।


तिरंग्यातील लाल रंग

कधी न दिसे कुणाला

शहिदांना मीच कवेत घेतो

सलाम करतो शौर्याला..!!


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍