STORYMIRROR

Nandini Menjoge

Others

4.3  

Nandini Menjoge

Others

..ती ..

..ती ..

1 min
397


प्रेमाचा झरा आणि 

         मायेचा स्पर्श ती …

वडिलांस कोवळी साद 

         आणि समईची वात ती…

भावाची गोड काळजी 

         आणि आधाराची वाट ती... 

नातवंडांस गोष्टींची सैर 

         आणि हक्काचीप्रतिरुप आई ती …

नात्यांची बांधणी आणि 

         भक्कम गृहस्तंभ ती...

कुप्रथेचा अंत आणि 

         न्यायाचा प्रखर प्रकाश ती.. 

सहनशक्ती चा सूर्यास्त आणि

         दिव्यशक्ती सूर्योदय ती …

पाउलांत तृप्ती सुख आणि

         प्रगती पंखाची गगनभरारी ती …

अस्तित्वाचा जन्म आणि जन्माचं सार्थक ती... 


Rate this content
Log in