ती वाट ( सहाक्षरी )
ती वाट ( सहाक्षरी )
1 min
359
सहज दिसली
ती वाट दूरची
ओळखीची तरी
भासे दुराव्याची
चालतांना उगा
मागे पहायची
गिनती का व्हावी
दोन पावलांची
कितीदा निवांत
सावली झाडाची
होई घालमेल
भेटण्या जिवाची
धडधड वाढे
जवळीकतेची
गती चढे कशी
सहज श्वासांची
कळलेच नाही
घडी विरहाची
येईल सोबत
संधी चालण्याची
