STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

ती निघून जाता

ती निघून जाता

1 min
344

ती म्हणाली येते रे

नकळत पाणावले डोळे

शब्दच थिजले ओठी

ती पाठमोरी होता


चूक नव्हतीच तिची

मीच गाफील होतो

सूर ताल लयही

जुळले परस्परांचे


मूक त्या भावनांना

तुडवून ती गेली

प्रेम नय्या कशी ही

बुडवून ती गेली


नाही कसा म्हणू मी ?

प्रेम नव्हते कधीही

वसंत बहरला अन ...

पानगळ ही झाली


ती जाता निघून

मी हताश होतो

अलगद ओठावर

तिचेच गीत होते


उदासली ती पायवाट

संपली प्रतीक्षा तरीही

स्मृतिबंधातूनी तिचे  

झंकारले विरह गीत


Rate this content
Log in