ती आहे
ती आहे
1 min
271
ती आहे म्हणून माझ्या
जगण्याला अर्थ आहे
जीव ओवाळावा तिच्यावर
इतकं तिचं प्रेम निस्वार्थ आहे
ती आहे म्हणून माझा
संयम कधी नाही सुटला
तिच्या सोबतीने जीवनाचा
खरा आनंद मी लुटला
ती आहे कधी अवखळ
झऱ्यासारखी खळखळ वाहणारी
पण प्रसंगी पाठिशी
खंबीर उभी राहणारी
ती आहे झाडाची
शितल छाया
प्रत्येकाला आपलेपणाने
लावते माया
