तिचे मुक्त आभाळ
तिचे मुक्त आभाळ
1 min
227
तिचे मुक्त आभाळ
गवसू दे तिला
करू देत सादर मग
तिच्या उपजत कला
घेऊ देत भरारी
मोकळ्या गगनात
ठेव तिच्या गुणांना
नेहमी तुझ्या स्मरणात
टाकू दे पाऊल तिला
भारावलेल्या जगात
साध्य करण्या स्वप्न
धावू दे तिला वेगात
नको बांधूस हात तिचे
नको देऊस यातना तिला
पसरू दे पंख तिचे
आकारू दे तिच्या जगाला
ती माता, ती बहिण
ती असते पत्नी कुणाची
कधी मवाळ कधी कठोर
ती असते हळव्या मनाची
