थोडं समजून घ्यावे
थोडं समजून घ्यावे




थोडं समजून घ्याव म्हणजे
वाद वाढले जात नाहीत
मन मोकळे बोलावे म्हणजे
मनात क्लेश वाढत नाहीत
शब्दाला शब्द वाढवू नका म्हणजे
टोकाच्या भूमिका घेतल्या जात नाहीत
कोणाचाही आनंद हिरावला म्हणजे
आनंदी मने आपली होत नाहीत
शब्दांचा वापर योग्य केला म्हणजे
अर्थाचे अनर्थ होत नाहीत
नात्यातले दुरावे वाढले नाही म्हणजे
नात्यांची ताटातूट होत नाहीत