सय
सय
1 min
160
पिकलं पान निरोप घेई
सळसळ करीत खाली येई
वाऱ्यासंगे गिरक्या घेई
उंच उंच आकाशी जाई
फळ पडे भूमीवरी
पसरे बीज चोहीकडे
वाऱ्यासंगे प्रवास करी
माळोरानी बीज पडे
आठवणींचा बहर येई
मन माझे गाणे गाई
येता सय गारवा येई
आनंदाने गिरक्या घेई
येता सर पावसाची
झाडीवेली न्हाऊन जाती
वाऱ्यासंगे सर पावसाची
गिरक्या घेत नाचू लागती
आठवणींचा मोर पिसारा
मनास माझ्या भुलवी सारा
पडता पाऊस फुलवी पिसारा
संगे घेऊनि पाऊस धारा
आला पाऊस आला वारा
कोसळती या जलधारा
धरती वरती वादळ वारा
थैमान घाली चौफेर सारा
अश्या कश्या काळोख्या राती
रातकिडे किर्रकिर्र करती
भक्ष्य शोधण्या बाहेर पडती
सरपटणारे सखे सोबती
